शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदार मोहन सुरेश ढमढेरे याच्याविरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या प्रकरणी विष्णू बाळाजी ढाळस्कर (वय ५८) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी कोरेगाव (ता. शिरूर) येथील ट्रान्सपॅक इंडिया प्रा. लि. कंपनीत अमोल विष्णू ढाळस्कर (वय ३०) हा कामगार छतावरील पत्रे बदलण्याचे काम करीत होता. उंचावरील कामासाठी आवश्यक प्रशिक्षण व सुरक्षेची साधने त्यांना देण्यात आली नव्हती, असा आरोप आहे. काम सुरू असताना अमोल ढाळस्कर यांचा खाली पडले होते.