पुणे : ‘समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी ‘अखंड’ हे माध्यम निवडले. अखंड म्हणजे अभंगच. तुकाराम महाराज आणि महात्मा फुले यांनी जातीव्यवस्था मोडली पाहिजे, असाच संदेश दिला आहे,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
महात्मा जोतिराव फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘संवाद, पुणे’तर्फे ‘सत्यशोधक महात्मा’ या नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. या नाटकाचा मुहूर्त, नाटकातील काही भागांचे अभिवाचन आणि बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण या वेळी उपस्थित होते.