मद्रिद : दक्षिण स्पेनमध्ये गुरुवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत लागलेल्या भीषण वणव्यात (जंगलातील आग) किमान ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या अल्मेरिया येथील या आगीत अनेक मृतांचे मृतदेह जळालेल्या वाहनांमध्ये आढळून आले.
ठाण्यात घर पडून मुलाचा मृत्यूठाणे : ठाण्याच्या ब्रह्मांड येथील आझादनगर परिसरात चाळीतील घराच्या पडझडीत जयकुमार जयस्वाल (वय १२ या मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत जयकुमारची आई उर्मिला जयस्वाल (वय ३५) आणि भाऊ विनित (वय ९) जखमी झाले. आझाद नगरमधील मद्रास चाळीत ही दुर्घटना घडली. एका घराच्या गॅलरीचा भाग समोरील घरावर कोसळला. या समोरील घरात उर्मिला व त्यांची दोन मुले झोपली होती.
जास्त अल्कोहोलयुक्त औषधांसाठी प्रीस्क्रिप्शन
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्क्यांपेक्षा जास्त इथाइल अल्कोहोल असलेली औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रीस्क्रिप्शन) विकण्यास बंदी घातली आहे. ही औषधेही ‘शेड्यूल एच१’अंतर्गत येतील.