मद्रिद : दक्षिण स्पेनमध्ये गुरुवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत लागलेल्या भीषण वणव्यात (जंगलातील आग) किमान ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. देशातील आजवरच्या सर्वांत घातक वणव्यांपैकी हा एक मानला जात आहे. सध्या स्पेनचा मोठा भाग तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करीत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या अल्मेरिया येथील या आगीत अनेक मृतांचे मृतदेह जळालेल्या वाहनांमध्ये आढळून आले. या भीषण आगीत अन्य आठ जण जखमी झाले आहेत.