सोळा नगरसेवक भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
16 councilors join bjp in delhi municipal corporation
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून (आप) फुटून स्थापन झालेल्या इंद्रप्रस्थ विकास पक्षाच्या (आयव्हीपी) सर्व १६ नगरसेवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यामुळे दिल्ली महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या विलीनीकरणानंतर २५० सदस्यीय दिल्ली महापालिकेमध्ये भाजपचे संख्याबळ १३९ झाले असून, आम आदमी पक्षाचे संख्याबळ १२३ वर आले आहे. २०२२ मधील महापालिका निवडणुकीत भाजपने १०४ जागा जिंकल्या होत्या.