दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात रविवारी पहाटे ‘नूल’ चक्रीवादळाने धडक दिल्यानंतर मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात १० जणांचा मृत्यू झाला.
यंदा चीनला धडक देणारे हे १२ वे आणि आतापर्यंतचे सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळ असून, रविवारी पहाटे सुमारे ३.५० वाजता ग्वांगडोंगमधील हुईझोऊ शहराजवळ ते किनाऱ्यावर धडकले. ताशी १६२ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे प्रदेशातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. चीनच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध, नियंत्रण व मदत आयोगाने ग्वांगडोंगसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत प्रतिसाद लागू केला आहे.