गोलाघाट : आसाममधील गोलाघाट जिल्हा कारागृहातील तीन कैद्यांच्या पलायनास मदत केल्याच्या आरोपावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.
गोलाघाटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजनसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गुन्हेगार शनिवारी शहीद कुशल कोंवर जिल्हा रुग्णालयातून पसार झाले. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ‘या तिघांच्या पलायनास तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केेली,’ असे सिंह यांनी सांगितले.