रस्ता खचल्यानेमाळशेज घाट बंद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
malshej ghat road closed due to landslide travelers will face inconvenience
जुन्नर : करंजाळे (ता. जुन्नर) येथे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता २०० मीटर खचल्याने माळशेज घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

२४ जुलै रोजी घाटातील रस्ता काही प्रमाणात खचल्याने दहा फुटापर्यंत खड्डा पडला आहे. पुण्याकडून आळेफाटा, माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक चाकण-तळेगाव-लोणावळा या मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरील एसटीची वाहतूक २५ जुलैपासूनच बंद केल्याचे नारायणगाव एसटी आगाराचे व्यवस्थापक वसंत अरगडे यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त...२