तीन अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत

Contributed byमॉस्को|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
safe return of astronauts to earth
मॉस्को : अमेरिका-रशियाच्या संयुक्त अंतराळ मोहिमेतील तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ महिन्यांच्या वास्तव्यानंतर रविवारी कझाकस्तानमधील गवताळ प्रदेशात सुखरूप परतले.

नासाचे अंतराळवीर ख्रिस विल्यम्स तसेच, रशियाचे सेर्गेई कुड-स्व्हेर्चकोव्ह आणि सेर्गेई मिकाएव यांना घेऊन आलेले सोयुझ एमएस-२८ हे अंतराळयान झेझकाझगान शहराच्या आग्नेय दिशेला निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षित उतरले.