चौदा वाहनांनाबेस्ट बसची धडक

महाराष्ट्र टाइम्स
best bus collides in andheri damage to 14 vehicles
अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथे एका ‘बेस्ट’ बसने १४ वाहनांना धडक दिली. या धडकेत दोन जण जखमी झाले. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. बेस्टच्या बस अपघाताची गेल्या चार महिन्यांतील ही पाचवी घटना आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एस. व्ही. रोडवर उजवीकडे वळताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.