ठाण्यामध्ये ग्रामीण डाक सेवकांचे संमेलन

महाराष्ट्र टाइम्स
special conference of rural postal workers in thane
भारतीय टपाल विभागाच्या नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे ग्रामीण डाक सेवक संमेलन ठाण्यातील जिनीजभाई भवनात उत्साहात पार पडले. नवी मुंबई प्रादेशिक विभागातील विविध भागांतील १५०हून अधिक ग्रामीण डाक सेवकांनी या संमेलनात सहभाग घेतला. ग्रामीण डाक सेवकांशी संवाद वाढविणे, त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करणे आणि नागरिकाभिमुख टपाल व वित्तीय सेवा अधिक प्रभावी करणे, या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला. डाक सेवा संचालक डॉ. अभिजित इंचके यांनी नियोजन केले. यावेळी टपाल विभागातील डिजिटल परिवर्तन, आधुनिकीकरण उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रामीण डाक सेवकांनीही कार्यपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि भविष्यातील नियोजनाविषयी मते मांडली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामीण डाक सेवक, विभागीय कर्मचारी आणि डायरेक्ट एजंट यांचा गौरव करण्यात आला.