करावे गावात भरदिवसा घरफोडी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
burglary in karave village during daytime jewelry worth 339 lakhs stolen
नवी मुंबई : करावे गाव परिसरात चोरांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख ३९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय सागरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. करावे गाव, सेक्टर ३६ येथील कृष्णा डेअरीच्या मागे असलेल्या हिराबाई निवास इमारतीत २१ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही घटना घडली. चोराने इमारतीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.