ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त ठाण्यातील उपवन तलावाकाठी उभारण्यात आलेल्या ५१ फूट उंच विठ्ठलमूर्तीसमोर शनिवारी महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाटावर हा सोहळा होणार आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची निर्मिती करण्यात आली. या कामाच्या पुढील टप्प्यात येथे विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे.