नमस्ते शौर्य फाऊंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे शनिवार, २५ जुलै रोजी कारगिल शौर्यगाथा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता बोडस सभागृह, रामनगर, केळकर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे हा कार्यक्रम होईल. मृत्यूंजयवीर आणि शौर्यचक्र सन्मानीत पॅरा कमांडो स्पेशल फोर्समधील निवृत्त सैनिक मधुसुदन सुर्वे या कार्यक्रमात कारगिल युद्धाचे अनुभवकथन करणार आहेत. रसिकांना या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.