मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

महाराष्ट्र टाइम्स
grand social initiative on chief ministers birthday
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व गौरव सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी बेलापूर येथील सुनील गावसकर मैदानावर सामाजिक सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात तब्बल २ हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरजू, हुशार तसेच अनाथआश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वांना शालेय गणवेश, वह्या आणि दप्तरांचे (स्कूल बॅग) वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ९०० ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.