निविदा प्रक्रियेवर प्रश्न

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
irregularities in the tender process serious allegations by bjp corporator sunesh joshi
भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी वृक्षप्राधिकरण समितीच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. वृक्षछाटणी ची निविदा मे महिन्यात काढली जाते आणि काम जूनमध्ये सुरू होते. प्रत्येक प्रभाग समितीसाठी १५ ते २० लाखांची तरतूद अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षप्राधिकरण समितीकडे असलेल्या ठेवीवरील व्याजाचा वापर वृक्षछाटणी आणि संबंधित कामांसाठी केल्यास वर्षभर छाटणी शक्य होईल, असे मत त्यांनी मांडले. गृहनिर्माण संस्थांमधील वृक्षछाटणीचे दर निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.