काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्र टाइम्स
काँग्रेसची निदर्शने
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी अलिबाग येथे निदर्शने आणि रॅली काढण्यात आली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले भवन परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा, फलक आणि पक्षाचे झेंडे घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण झालेच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रक्षणाची शपथ घेत आंदोलनाची सांगता करण्यात आली.