Dismissal Of Two Female Municipal Councilors In Mumbai
आणखी दोघींचे नगरसेवकपद रद्द
महाराष्ट्र टाइम्स•
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘ एमआयएम ’ या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे पद रद्द करण्यात आले आहे. अनुक्रमे बुशरा कप्तान मलिक आणि रोशन शेख अशी या दोन नगरसेविकांची नावे आहेत. पालिकेत आतापर्यंत ‘एमआयएम’चे दोन, शिवसेना (उबाठा) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी एक अशा चौघांनी पद गमावले आहे.
बुशरा या ‘राष्ट्रवादी’कडून कुर्ला, प्रभाग क्रमांक १७०मधून, तर रोशन शेख मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १३८मधून ‘एमआयएम’च्या तिकिटावरून निवडून आल्या होत्या.