Due To Rain Landslide On Mumbai karjat lonawala Route 1100 Workers Are Working Round The Clock
१,१०० कामगार; अहोरात्र काम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : पावसामुळे रविवारी मध्यरात्रीनंतर भूस्खलन झाले. यामुळे मुंबई-कर्जत-लोणावळा या घाटातील मार्गिकेवर दरडी कोसळल्या. माती ढासळली. मुंबई-पुणे मार्गावर बहुतांश मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे संचालन कर्जत-लोणावळा विभागातील तत्परतेने वाहतूकीसाठी पूर्ववत करण्यात आलेल्या मार्गांवरून केले जात आहे. बाकीचा बाधित रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी १,१०० कामगार अहोरात्र काम करत आहेत, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘दावे दमदार, काम सुमार’ या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, ‘बाधित रेल्वेमार्गाजवळ केवळ रेल्वेने पोहोचण्याची सोय आहे. आव्हानात्मक भौगोलिक स्थिती, सोसाट्याचा वारा या प्रतिकूल परिस्थितीत काम होत आहे. ’