Maharashtra Banks Profit Increases By 27 Reached 2020 Crores
महाबँकेच्या नफ्यात वाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : बॅंक ऑफ महाराष्ट्रने ( महाबँक ) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा २७ टक्क्यांनी वाढून २,०२० कोटी रुपये झाल्याचे जाहीर केले. पुणेस्थित या बॅंकेने वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत १,५९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
बॅंकेने नियामकाकडे सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे की, आढावा घेतलेल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ७,८७९ कोटी रुपयांवरून ९,०६३ कोटी रुपयांवर पोहोचले. बॅंकेला मिळालेले व्याज मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीतील ७,०५४ कोटी रुपयांच्या तुलनेत ८,०३७ कोटी रुपयांवर पोहोचले. बॅंकेची एकूण अनुत्पादित कर्जे (एनपीए) वर्षभरापूर्वीच्या १.७४ टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीअखेर एकूण कर्जाच्या १.४५ टक्क्यांवर घसरली.