Mumbai pune Railway Service Crisis Due To Landslides St Corporation Starts Additional Bus Service
रेल्वेच्या मदतीलाएसटी धावली
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई-पुणेदरम्यान रेल्वे घाटमार्ग दरडींमुळे बाधित झाला आहे. यामुळे रोज ३० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारपासून मुंबई-पुणेदरम्यान दोनशे अतिरिक्त बस फेऱ्या धावणार आहेत.
मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरीच्या ३१२ फेऱ्या रोज धावत आहेत. त्याचबरोबर आता साध्या बसगाड्यांच्या रोज दोनशे अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ‘प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी बसगाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे’, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
‘पूर्ण क्षमतेने सज्ज’
‘रेल्वेसेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. गरजेनुसार आणखी बससेवा उपलब्ध करावी’, अशी सूचना केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.