Supreme Court Hearing On Ayodhya Ram Temple Donation Fraud
राम मंदिर दान अपहाराबाबत सोमवारी सुनावणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील देणग्या व निधीच्या कथित अपहार प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) व स्वतंत्ररfत्या चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहन यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण ‘कॅग’ आणि महालेखा परीक्षक यांच्यामार्फत करण्याचीही मागणी केली आहे. अजयकुमार राय आणि दिनेश कुमार यादव यांनीही ‘सीबीआय’ चौकशीसाठी अशाच निर्देशांची मागणी केली आहे.