‘राज्य महिला आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करावी, अशी सूचना राज्य सरकारला केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘महिलांच्या तक्रारींचे तातडीने निवारण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम महिला आयोगाची आवश्यकता आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाशिक येथील अशोक खरात याच्याशी संबंधित कथित वादग्रस्त प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी २० मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. चार महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. याविषयी विचारले असता रहाटकर म्हणाल्या, महिलांना वेळेवर न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक आहे.