तणावपूर्ण वातावरण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tense atmosphere in delhi due to protests impact on daily life
राजधानी दिल्लीतील आंदोलनामुळे जंतरमंतर आणि परिसरातील वातावरण गुरुवारीही तणावपूर्ण राहिले. जनपथ लेन ते संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरात आंदोलकांची मोठी उपस्थिती दिसून आली. परिसरात हजारो पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. सुरक्षा कारणास्तव कनॉट प्लेससह मध्य दिल्लीतील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा दिवसभर विस्कळीत राहिल्याने व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऑनलाइन व्यवहार, कॅब सेवा आणि इतर डिजिटल सुविधांवर त्याचा परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कनॉट प्लेसमधील व्यापारी संघटनांनी गुरुवारी सायंकाळी ६.३० नंतर दुकाने, शोरूम, रेस्टॉरंट आणि क्लब बंद ठेवण्याचे आवाहन केले. या निर्णयामुळे राजधानीतील प्रमुख व्यावसायिक केंद्रातील व्यवहारांवर परिणाम झाला.