‘यंदाचा गणेशोत्सव व्यापक’

महाराष्ट्र टाइम्स
ganesh festival 2023 declared as state festival
राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘ राज्य महोत्सव ’ म्हणून घोषित केल्यानंतर यंदा हा उत्सव अधिक व्यापक, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी गुरुवारी दिले. यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून कृती आराखडा तयार करावा आणि त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने काढावा, असेही त्यांनी सांगितले.