Distribution Of Fish Seeds To 550 Farmers In Raigad District
५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीज वाटप
महाराष्ट्र टाइम्स•
उरण तालुक्यातील खोपटे येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील ५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मत्स्यपालन क्षेत्राचा विकास रायगडच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्ह्याला लाभलेल्या १२२ किलोमीटर समुद्रकिनाऱ्यामुळे सागरी तसेच गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला मोठी संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्वत पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे ते म्हणाले. ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून मत्स्यपालन तंत्रज्ञान, खाद्य व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण होणार आहे.