‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
maharashtra bandh receives mixed reactions
पुणे : ‘ नीट पेपरफुटी ’ प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे गुरुवारी पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बंद ’ला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय), आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भीम आर्मी, सम्यक विद्यार्थी आंदोलन , रिपब्लिकन सेना यांसह अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला.