‘एमसीए’साठी ३३ हजार जणांची नोंद

महाराष्ट्र टाइम्स
‘एमसीए’साठी ३३ हजार जणांची नोंद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘एमसीए’ अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार २४ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. या गुणवत्ता यादीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइन मधूनच तक्रारी नोंदविता येतील. या तक्रारी २५ ते २७ जुलै या कालावधीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येतील. यानंतर २९ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेशाची पहिली फेरी ३० जुलै रोजी सुरू होणार आहे. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होतील. यानंतर संस्थास्तरीय प्रवेश होतील. प्रवेशाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेर्यंत पूर्ण होणार असल्याचे ‘सीईटी’ सेलकडून कळविण्यात आले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत असलेल्या ‘मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन’ (एमसीए) प्रवेश नोंदणीची दुसरी मुदतवाढ संपली. आतापर्यंत ३३ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यापैकी २९ हजार १८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची पडताळणी, निश्चिती केली आहे. हेच विद्यार्थी पुढील प्रवेशाच्या फेऱ्यामध्ये सहभागी होतील, असे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले.
‘एमसीए’ प्रवेशासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत २१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. या मुदतीत ३३ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; तर २२ जुलै रोजी २९ हजार १८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची पडताळणी करून या प्रवेश अर्जाची निश्चिती केली. ही संख्या गेल्या वर्षापेक्षा १९३७ ने जास्त आहे. गेल्या वर्षी (सन २०२५-२६) २७ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.