विवाहापूर्वी नात्याला समजुतीची जोड

महाराष्ट्र टाइम्स
pre marriage dialogue center a journey of understanding
‘विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे; तर दोन कुटुंबांचा प्रवास असतो. हा प्रवास विश्वास, संवाद आणि परस्पर सन्मानावर उभा राहावा,’ या विचारातून राष्ट्रीय महिला आयोगाने ज्ञानप्रबोधिनी येथे ‘तेरे मेरे सपने’ हा विवाहपूर्व संवाद केंद्र सुरू केले आहे.

उपक्रमात विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या युवक-युवतींना समुपदेशन, मुक्त संवाद, वैवाहिक जबाबदाऱ्या, करिअर, कुटुंबातील भूमिका , मानसिक आरोग्य, परस्पर आदर आणि कायदेशीर हक्क याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या वेळी ज्ञानप्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधनच्या प्रमुख गौरी कापरे, प्रज्ञा मानस संशोधिकेच्या डॉ. अनघा लवळेकर या वेळी उपस्थित होत्या.

ज्ञानप्रबोधिनी विविध समाज घटकांसाठी काम करीत असल्याने येथे हे केंद्र सुरू होत असल्याचे डॉ. लवळेकर प्रास्ताविकात नमूद केले.