Commissioner Orders To Halt Pre audit Anger From Municipal Councilors
प्री ऑडिट बंदसाठी हवेत आयुक्तांचे आदेश
महाराष्ट्र टाइम्स•
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी प्री ऑडिट बंद करण्याचे आदेश दिलेले असले तरी त्यासाठी आयुक्तांचे लेखी आदेश आवश्यक आहेत,’ असे उत्तर मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे यांनी दिले. त्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्री ऑडिटमुळे विकासकामांच्या फाइल वेगाने निकाली लागत नाहीत. परिणामी विकासकामे होण्यास विलंब लागतो. प्री ऑडिटमुळे अनेक फाइल प्रशासकीय कामकाजातच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्री ऑडिटची पद्धत तातडीने बंद करण्यात यावीअशी मागणी स्थायी समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींनी देखील प्री ऑडिट तातडीने बंद करण्यात यावे, असे आदेश दिले होते.; तसेच काम झाल्यावर पोस्ट ऑडिट करा असेे त्यांनी पालिका प्रशासनाला सांगितलेे होते. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्री ऑडिटचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सभापतींनी या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश मुख्य लेखापरिक्षक शिवाजी नाईकवाडे यांना दिले. नाईकवाडे म्हणाले, प्री ऑडिट करण्याबद्दल आयुक्तांचे लेखी आदेश आहेत.
हे आदेश रद्द करून प्री ऑडिट न करण्याबाबतचे सुधारित आदेश हवे आहेत. हे आदेश प्राप्त झाल्यावरच प्री ऑडिट बंद करता येणा आहे. त्याचप्रमाणे यावर सभापतींनी आयुक्तांशी या बाबत चर्चा झाली असल्याचे सांगून प्री ऑडिट तत्काळ बंद करा असे आदेश दिले.