न्यायालयाच्या दट्ट्यानंतर पाडकाम

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
न्यायालयाच्या दट्ट्यानंतर पाडकाम
बोरिवली पूर्वेकडील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न हटविल्याने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन तातडीने रोखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी महापालिकेतर्फे २७ व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली.

बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित भूखंडावरून महापालिका आणि एक खासगी विकासक यांच्यात दीर्घकाळापासून न्यायालयीन वाद सुरू आहे. भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात न्यायालयाने नोव्हेंबर, २०२५ आणि २०२६ मध्ये आदेश देऊनही अतिक्रमण जैसे थेच राहिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांचे (पान ५वर)