Original Recruitment Method In Agnipath Scheme To Remain
‘मूळ भरतीपद्धत कायम राहणार’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘नव्या बदलांमुळे बहुतेक अग्निवीरांसाठी सैन्यदलात कायमस्वरूपी समावेशाचा मार्ग खुला होईल. मात्र, या निर्णयामुळे अग्निपथ योजनेतील मूळ भरतीपद्धत रद्द होणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नियमित सेवेत दाखल होणाऱ्या २५ टक्के अग्निवीरांची ज्येष्ठता कायम राहील. दोन वर्षांचा अतिरिक्त सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर नियमित सैन्यदलात दाखल होणाऱ्या अग्निवीरांना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ स्थान मिळेल’, असे जनरल राजासुब्रमणी यांनी नमूद केले.