New Voter Registration And Declaration Process Independent
मतदारनोंदणी अर्ज, घोषणापत्र स्वतंत्र
Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कार्यवाही करत मतदारयाद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) सुरू असणाऱ्या राज्यांमध्ये नवीन मतदार नोंदणीशी संबंधित अर्ज आणि त्यासोबतचे घोषणापत्र ऑनलाइन प्रक्रियेत स्वतंत्र केले आहेत.
आयोगाने सप्टेंबर महिन्यात एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांतील आपल्या डिजिटल मंचावरून घोषणापत्र आधीच हटवले होते. मतदारयादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्यांकडून फॉर्म-६ भरला जातो. बिहारमध्ये एसआयआरनंतर निवडणूक आयोगाने यासोबत घोषणापत्र जोडणे बंधनकारक केले होते. यामध्ये फॉर्म-६ भरणाऱ्या अर्जदारांच्या पालकांचे एसआयआरसंबंधी तपशील आवश्यक होते.आधीच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या विहित वैधानिक फॉर्म-६ आणि घोषणापत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा केली आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.
प्रतिज्ञापत्रात काय?
मतदारयादी विभागाच्या २१ ऑक्टोबरच्या निर्णयानुसार, प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याप्रमाणेच ऑनलाइन फॉर्म-६देखील दोन स्वतंत्र भागांत विभागले जातील. या नियमानुसार फॉर्म-६ आणि एसआयआर घोषणापत्र यांचा समावेश असेल.