नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाच्या बुडीत क्षेत्रात अतिक्रमण करून अलिशान फार्म हाऊस उभारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ‘मे. सामत फार्म’ नामक हे फार्म हाऊस राज्यातील एका माजी मंत्र्याचे असल्याचे बोलले जाते.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे बोरगाव (खुर्द) येथे मोरबे धरणाच्या उर्ध्व बाजूस (अपस्ट्रीम) हे अतिक्रमण करण्यात आले असून, सुरज मनोहर सामत यांनी या ठिकाणी 'मेसर्स सामत फार्म' नावाचे फार्म हाऊस आणि भलीमोठी आरसीसी सुरक्षा भिंत अनधिकृतरित्या उभारल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्ती ही राजकारणातील मोठे प्रस्थ असल्याची सर्वत्र चर्चा आहे.नवी मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या या धरण परिसराची सुरक्षितता अत्यंत संवेदनशील मानली जाते. शासनाच्या नियमांनुसार धरणाच्या बुडीत क्षेत्रात व महत्तम पूर पातळीलगत कोणत्याही प्रकारची बांधकामे, उत्खनन किंवा मानवी हस्तक्षेप करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही सक्षम प्राधिकरणाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जलाशयाच्या पात्रात थेट भराव टाकून हे बांधकाम करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ऑक्टोबर २०११, जानेवारी २०१३ आणि ऑक्टोबर २०१८ च्या सॅटेलाइट (पान ५वर)