योग मित्रमंडळातर्फे गुरुपौर्णिमा

महाराष्ट्र टाइम्स•
guru purnima 2023 special celebration by yoga mitra mandal
योग मित्रमंडळातर्फे गुरुपौर्णिमा साजरी झाली. या वेळी ऋषीकेश येथील स्वामी शिवानंद सरस्वती, बिहार योग विद्यालयाचे संस्थापक स्वामी सत्यानंद सरस्वती आणि सध्याचे प्रमुख स्वामी निरंजनानंद सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन गोपाळ कुलकर्णी, वसंत पाटील व श्रीकांत पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. योग मित्रमंडळाची स्थापना आणि मंडळाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षांपासून योग-प्रचार आणि प्रसाराचे कार्य केल्याबद्दल गोपाळ कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी स्तोत्र पठण, भजन संकीर्तन आणि हवन करण्यात आले. प्रा. सीमा शिंदे यांनी गुरू स्तोत्र, डॉ. वैशाली तौर यांनी गुरुपादुका स्तोत्र व ‘गुरु के गीत गाओ’ हे संकीर्तन सादर केले. निशिगंधा महाजन यांनी सद्गुरू वंदना सादर केली.
यानंतर १०८ गुरुगायत्री मंत्राने हवन करण्यात आले. यामध्ये श्रीकांत पत्की, सीमा शिंदे, वैशाली तौर, निशिगंधा महाजन, स्वाती भामरे, शरद कुलकर्णी, अर्चना वाईकर यांनी भाग घेतला. या वेळी रवींद्र भामरे व सभासद उपस्थित होते.