आहार, सुरक्षेची काळजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
pet safety and care the importance of shelter
आहार, सुरक्षेची काळजी

प्राण्यांसाठी सुरू झालेल्या हॉस्टेल आणि केअर सेंटरमध्ये स्वच्छता, कोमट पाणी, आहार आणि सुरक्षितता यांसारख्या निकषांचे पालन केले जाते. प्राणी येथे सुरक्षित आहेत, ही भावना पालकांना देण्याचा प्रयत्न केला जातो, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्राची यांनी सांगितले. दिवाळी, मे महिन्याच्या सुट्या आणि डिसेंबरमध्ये अशा सेंटरची मागणी वाढते, असा अनुभव चालकांनी सांगितला. पाळीव प्राणी घरात एकटे राहू शकतात, असा समज असला तरी त्यांनाही सहवासाची गरज असते. पालकांच्या अनुपस्थितीत ही साथ आणि देखभाल अशा सेंटरमध्ये दिली जाते.