Arrest Businessman Rana Suryavanshi Immediately Former Mla Ravindra Dhangekar Warns
‘राणा सूर्यवंशी यांना अटक करा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : ‘उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी बनावट चकमकीचा बनाव करून सुरक्षा वाढवून घेतली होती. पोलिसांचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. सूर्यवंशी यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा काढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले; तसेच त्यांना तातडीने अटक करावी; अन्यथा ते परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला.
धंगेकर यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ‘सूर्यवंशी यांना सुरक्षा कोणी आणि कोणाच्या दबावाखाली दिली, याची चौकशी करावी. त्यांचे नेमके कोणत्या मंत्र्यांशी संबंध आहेत आणि त्यांना कोण वाचवत आहे, याचाही तपास व्हावा,’ अशी मागणी त्यांनी केली.पुणे ग्रामीण पोलिसांची दिशाभूल आणि बदनामी होत असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करावा. महायुतीबाबत पक्षांतर्गत चर्चा थांबविण्याच्या सूचना मिळाल्या असून, दुष्काळग्रस्तांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.