If Mamata Banerjee Hadnt Been Expelled Congress Wouldnt Be In This Situation Today
‘...तर काँग्रेसची ही अवस्था नसती’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘ ममता बॅनर्जी यांना १९९७मध्ये पक्षातून बाहेर केले नसते, तर आज विरोधी पक्ष ‘अशा परिस्थितीत’ नसता,’ अशा शब्दांत तृणमूल काँग्रेस चे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गुरुवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना सुनावले.
संसदेच्या प्रवेशद्वाराबाहेर बॅनर्जी यांनी गांधी आणि इतर काही काँग्रेस खासदारांची भेट घेतली. काही असंतुष्ट तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदारांना अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल लोकसभेतून निलंबित केल्यानंतर बॅनर्जी त्या २० बंडखोर खासदारांच्या छायाचित्रांचे पोस्टर गळ्यात घालून एकटेच आंदोलन करत होते. त्या वेळी झालेल्या संवादाच्या वेळी बॅनर्जी यांंनी प्रियांका यांना सुनावले.‘लोकसभेत बंगालमधील २० गद्दार’ या मथळ्यासह खासदारांची छायाचित्रे पाहून गांधी यांनी, यातील काही बंडखोर खासदारांनी प्रथम काँग्रेस सोडून ‘तृणमूल’मध्ये प्रवेश केला होता. गेल्या महिन्यात ममता बॅनर्जी यांना सोडून नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (एनसीपीआय) सामील झाल्याची आठवण करून दिली.