आयआयटी बदलाची विद्यार्थ्याला परवानगी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
important verdict on iit transfer supreme court grants student permission to migrate
नवी दिल्ली : ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’चे निदान झालेल्या आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याला वैद्यकीय कारणास्तव आयआयटी रुरकीमध्ये स्थलांतरित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिली. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने, वास्तुशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याच्या स्थलांतरासाठी घटनेच्या कलम १४२ अंतर्गत आपल्या विशेष अधिकारांचा वापर केला. एका आठवड्याच्या आत आवश्यक स्थलांतर/मायग्रेशन प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्याचे निर्देश संस्थेला दिले.