India Development Council Organizes Guruvandan Program Honoring Teachers
भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छत्रपती संभाजीनगर : सेवाभावी संस्कारातून, गुरुवंदन-छात्र अभिनंदनाचा सहवास घडवून भारत विकास परिषदेची पूर्व शाखा व पश्चिम शाखा यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी जागृती हायस्कूल येथे ‘गुरुवंदन-छात्र अभिनंदन’ कार्यक्रम प्रांताचे अनिल सोनी,विद्या पाटील, पश्चिम शाखेचे अध्यक्ष गोपाल काळे, पश्चिम शाखेचे सचिव विलास खंडेलवाल, देवजीभाई पटेल, पूर्व शाखेच्या उपाध्यक्षा मंगल चव्हाण, पूर्व शाखेच्या अध्यक्ष मोहिनी कुबेरकर, शाखेच्या महिला संयोजिका अमृता येवले, नवीन सभासद रूपाली यांची उपस्थिती होती. संगीता लटपटे, अलका खोडे यांची उपस्थिती होती. प्रत्येकी दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांचा ‘गुरुवंदन-छात्र अभिनंदनअंतर्गत सन्मान करण्यात आला. विद्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. देवजीभाई पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.