Indians Celebrate Ashadhi Ekadashi And Guru Pournima In Stanford
अमेरिकेतील भारतीयांकडून गुरुपौर्णिमा साजरी
महाराष्ट्र टाइम्स•
यंदा अमेरिकेतल्या स्टॅनफोर्डमध्ये आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. इथे राहणारी भारतीय कुटुंब कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता जगदीश गोपाळराव पाटील (ढोकीकर) सध्या अमेरिकेत त्यांची मुलगी पूजा पाटणकर हिच्याकडे आहेत. पाटील दरवर्षी आषाढी सोहळ्यात म्हणजे पंढरपूरची वारी करतात. या वर्षी त्यांना पंढरपूरला जाता आले नसले तरी स्टॅनफोर्डमध्येही आषाढी एकादशी साजरी केली, असे त्यांनी सांगितले. इथे राहणारी भारतीय कुटुंबे जवळच्याच कम्युनिटी हॉलमध्ये भेटतात. इथला साई सन्निधी ग्रुप दररोज हरिनामस्मरण, दर गुरुवारी व एकादशीला कार्यक्रम करतात. गेल्या बारा वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदाही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.