लायन्सचे मल्टिपल कौन्सिलचे अध्यक्ष भरत भलगट यांच्या हस्ते पदग्रहण झाले. त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष ज्योती उपाध्याय, प्रथम उपाध्यक्ष किशोर वाघमारे, स्मिता पेडगावकर आणि अर्चना ठोले यांना शपथ दिली.
यावेळी माजी प्रांतपाल राजेश राऊत, प्रांतपाल दत्तात्रेय औसेकर, मावळते अध्यक्ष प्रदीप गोयल, प्रांत अध्यक्ष डॉ. अश्विनी जैस्वाल, विभागीय अध्यक्ष शिरीष कंदी उपस्थित होते. मान्यवरांनी क्लबचा स्थायी प्रकल्प असलेल्या क्लासिक मोबाइल क्लिनिक व अँब्युलन्स याची पाहणी केली. प्रदीप गोयल यांनी गेल्या वर्षाचा आढावा घेतला. सचिव गोपाल बोचरे व कोषाध्यक्ष माणिक सांगळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजेश राऊत यांनी नवीन सदस्यांना माहिती दिली. दत्तात्रेय औसेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी प्रांतपाल तनसुख झांबड, अरविंद माछर, मोरेश्वर कुलकर्णी, मिलिंद दामोदरे, आनंद देसाई, किशोर ललवाणी,राधा तोरणेकर, स्मिता पेडगावकर, अॅड. अनघा पेडगावकर, डॉ. दिव्या ठोले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रश्मी जैन, संजय गुजराथी, अनिल उबरहन्डे, नितीन पेडगावकर, संदीप दोडल यांनी परिश्रम घेतले.