‘रंगी रंगला श्रीरंग’ कार्यक्रमाला दाद

महाराष्ट्र टाइम्स•
rangi rangala shrirang devotional music and blood donation camp for thalassemia patients
आषाढी एकादशीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ सीएसएन इलाइट आणि जानकी संगीत विद्यालय यांच्या वतीने ‘ रंगी रंगला श्रीरंग ’ हा विशेष भजन संध्या कार्यक्रम आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

श्रीकांत गोसावी व शरयू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात ४५ ते ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पांडुरंगाच्या सुरेल भक्तिगीतांनी सभागृह भक्तिमय झाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी जायंट्स ग्रुप ऑफ सीएसएन इलाइटच्या सदस्य कविता काकाणी यांनी थॅलेसेमिया रुग्णांच्या उपचारासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत सारडा व अनिता सोनी उपस्थित होते. उपक्रमासाठी अध्यक्षा चंचल मालानी, सचिव नीलिमा सारडा, प्रकल्पप्रमुख भाग्यश्री सोनी, ज्योती तांबट व जानकी संगीत विद्यालयाचा विद्यार्थी परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तबल्यावर सचिन शिंदे व सोहम कोठळे, पखवाज- आरुष जव्हेरी, टाळ - वेद गोसावी व रेणुका काळभांडे यांनी साथसंगत केली.