‘अपराधीपणातून शहा अनुपस्थित’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
raul gandhis fierce attack on amit shah why is shah currently absent
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा लक्ष्य केले. ‘शहा यांची संसदेतील अनुपस्थिती त्यांच्यातील अपराधीपणाची भावना दर्शवणारी आहे,’ असे ते म्हणाले; तसेच, विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या अतिबळाच्या वापराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असल्याचा व्हिडिओही राहुल यांनी ‘एक्स’वर प्रसृत केला. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा. आपल्या विद्यार्थ्यांविरोधातील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन करावी,’ असे त्यांनी या सोशल मीडियावर म्हटले आहे. ‘शहा संसदेत येऊन विद्यार्थ्यांवरील क्रूर हिंसाचाराचे स्पष्टीकरण देण्यास इतके का घाबरत आहेत? हे अपराधीपणाची भावना दर्शवते,’ असेही त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
देशात कितीही हिंसा, द्वेष, फूट पसरवली, तरी देशाचा आत्मा बंधुभाव, एकतेने भारलेला आहे, तो कधीही बदलणार नाही,’ असे प्रियांका गांधी- वद्रा यांनी गुरुवारी नमूद केले.

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरुवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयक मांडल्याचे स्वागत केले. ‘यामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा होतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘अलीकडील आंदोलनांत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, या आपल्या लेखी आश्वासनाचे पालन करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.