Tujhe Geet Ganyasathi Program On The Occasion Of Sudhir Phadkes Birth Anniversary
येत्या रविवारी कार्यक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छत्रपती संभाजीनगर : साहित्य संगीत कला मंचाच्या वतीने महान गायक व संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा त्यांच्या संगीतावर आधारीत कार्यक्रम सादर होणार आहे.
दोन ऑगस्टला सायंकाळी सात वाजता जीवन विकास ग्रंथालयाच्या ग्रंथमित्र भा. ब. आर्वीकर सभागृहात सादर होईल. वैभव पांडे आणि वर्षा जोशी गायन करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.