Vinayaki Sports Festival Dhyanam Ridhansing And Ashvi Clinch Top Spots In Skating
ध्यानम, रिधान, आश्वीची सरशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : ध्यानम त्रिवेदी, रिधानसिंग, आश्वी नागदा यांनी सोमेश्वर फाउंडेशनतर्फे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विनायकी क्रीडा महोत्सवातील रोलर स्केटिंग स्पर्धेत आपापल्या गटात जेतेपद मिळवले.
सनीज वर्ल्ड येथे हा क्रीडा महोत्सव सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन ‘स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे सचिव राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते, नरेंद्र जाधव, अशोक गुंजाळ, पुष्कर कुलकर्णी, डॉ. मोनिका सुर्वे, डॉ. उत्तरा अभ्यंकर आदी उपस्थित होते.निकाल : क्वॉड प्रकार : ६ वर्षांखालील विशेष मुले - रिधानसिंग, प्रयाग पाटील,अव्यान सारथी; विशेष मुली - आश्वी नागदा, आदृतीसिंग, शांभवी पांडे.
कुमार गट : विशेष मुले - स्वानंद दास, अबीर आदीश, समर पवार.
इनलाइन : विशेष गट - क्रिश सूर्यवंशी, अंशुल सोनारकर, श्रवण नाईत.
रिक्रिएशनल इनलाइन : विशेष गट मुले - ध्यानम त्रिवेदी, आर्यन सुतार, अथर्व रोशन.