संस्कारांची शिदोरी देणारं पुस्तक

Contributed byज्योती बडदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचकांना आईच्या अथांग प्रेमाची आणि त्यागाची ओळख करून देते. श्याम आणि त्याच्या आईच्या नात्यातून सत्य, करुणा, दयाळूपणा आणि स्वाभिमान या मूल्यांचे दर्शन घडते. कोकणातील ग्रामीण जीवन आणि गरिबीतील संघर्ष यातूनही मूल्यनिष्ठ राहण्याची शिकवण मिळते. हे पुस्तक मुलांना संस्कार आणि ध्येयवाद जपण्याची प्रेरणा देते.

book shyamchi aai a treasure of values

मची आई’ हे साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक मला फार आवडतं. त्यात आईच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची आणि संस्कारांची हृदयस्पर्शी ओळख आहे. हे पुस्तक साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असून, त्यात श्याम आणि त्याच्या आईच्या नात्याचं हृदयस्पर्शी वर्णन आहे. आईचं नि:स्वार्थ प्रेम, त्याग आणि तिच्या शिकवणीतून श्याममध्ये रुजलेल्या सत्य, करुणा, दयाळूपणा आणि स्वाभिमान या मूल्यांचं चित्रण केलं आहे.

कोकणातील ग्रामीण जीवन, गरिबीतील संघर्ष आणि त्यातूनही मूल्यनिष्ठ राहण्याची शिकवण या पुस्तकातून मिळते. मी ‘ श्यामची आई ’ हे पुस्तक लग्नानंतर वाचलं. तशी मला वाचनाची आवड आहे. वडील गोष्टीची पुस्तकं, मासिकं, कादंबरी आणायचे; त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. ‘श्यामची आई’ हे पुस्तक केवळ सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरुजींनी ओतला आहे. ते वाचताना हृदयाला स्पर्श करतं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिखाण सुरू केलं. हे पुस्तक केवळ कथा नसून, ते मुलांना संस्कार, शिक्षण आणि कठीण परिस्थितीत ध्येयवाद जपण्याची प्रेरणा देतं. आईच्या शिकवणीतून श्यामने घेतलेले प्रामाणिकपणा, मेहनत, बचत आणि मोठ्यांचा आदर हे धडे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.