पालिकेच्या शाळांमध्येसौरऊर्जेचे प्रयोग

Contributed byसंजीव सोनार|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या १७ शाळा आता सौरऊर्जेवर चालणार आहेत. एसबीआय बँकेच्या मदतीने या शाळांमध्ये सौर पॅनेल बसवले आहेत. यामुळे महापालिकेचा वीज बिलावरील मोठा खर्च वाचणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना अखंडितपणे डिजिटल शिक्षण मिळत राहील. हा एक महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम आहे.

पालिकेच्या शाळांमध्येसौरऊर्जेचे प्रयोग

ल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे,’ या उक्तीनुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमधील झालेला बदल उल्लेखनीय ठरला आहे. या शाळांमधून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व भविष्यवेधी शिक्षण देता यावे यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्व शाळा स्मार्ट शाळा केल्याआहेत. या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये इंटरॲक्टिव्ह बोर्ड, कम्प्युटर, व्हिज्युअलायझर, म्युझिक सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा अत्याधुनिक भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

आता ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या उपक्रमांतर्गत सर्व डिजिटल ई-लर्निंग सेवा सुविधांची सुसज्जता कायम राहावी महापालिकेचा वीज बिलाचा खर्च कमी होऊन, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये या उदात्त हेतूने महापालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या १७ शाळांवर सीएसआर फंडाच्या माध्यमातून सोलार यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या प्रयत्नातून एसबीआय बँकेचे रिजनल मॅनेजर यांच्याशी वारंवार संपर्क करून, आपल्या महापालिकेच्या सर्व शाळांना सोलार प्रकल्प कसे लागतील, सर्व शाळा सोलारच्या कशा होतील या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यात प्राथमिक शाळा उस्मानपुरा येथे तीन किलोवॉट क्षमतेचे सोलार पॅनेल बसवण्यात आले. प्राथमिक शाळा गारखेडायेथे १५ किलोवॉटचे, माध्यमिक शाळा प्रियदर्शनी येथेही १५ किलोवॉट, माध्यमिक विद्यालय सिडको एन-७ येथे १० किलोवॉट क्षमतेचे, प्राथमिक शाळा चेलीपुरा या ठिकाणी ५ किलोवॉट क्षमतेचे, प्राथमिक शाळा सिडको एन ११ येथे ८ किलोवॉटचे, केंद्रीय प्राथमिक माध्यमिक शाळा बेगमपुरा या ठिकाणी ५ किलोवॉटचे, माध्यमिक शाळा हरसुल गाव या ठिकाणी १० किलोवॉटचे, माध्यमिक शाळा बायजीपुरा या ठिकाणी ६ किलोवॉट क्षमतेचे, माध्यमिक शाळा मुकुंदवाडी या ठिकाणी १२ किलोवॉटचे, माध्यमिक शाळा किराडपुरा येथे १० किलोवॉटचे, माध्यमिक विद्यालय बन्सीलालनगर या ठिकाणी १० किलोवॉटचे, प्राथमिक शाळा जुबली पार्क या ठिकाणी १० किलोवॉट, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव येथे १० किलोवॉटचे, माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथे १० किलोवॉटचे, प्राथमिक शाळा चिकलठाणा या ठिकाणी पाच किलोवॉटचे आणि प्राथमिक शाळा एकनाथनगर या ठिकाणी ५ किलोवॉटचे अशा एकूण १७ शाळा एसबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून सोलार शाळा म्हणून नावारूपास येत आहेत. खरोखर हा एक अभिनव प्रकल्प आहे. यामुळे महापालिकेचा वीज बिलाचा खर्च कायमस्वरूपी वाचणार आहे. याशिवाय शाळांत सौरऊर्जेच्या माध्यमातून ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळणार आहे.

या शाळांचे महिन्याचे वीज बिल सरासरी ८० हजार रुपये ते एक लाख रुपये येते. शाळांना सोलार पॅनल लावल्यामुळे महापालिकेचे वार्षिक सरासरी दहा ते बारा लाख रुपये वाचणार आहेत.

(लेखक छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी आहेत.)