शेतकऱ्यांच्या बांधावर सुनेत्रा पवार

महाराष्ट्र टाइम्स

बारामती मतदारसंघात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला. प्रशासनाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाईल. शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल.

शेतकऱ्यांच्या बांधावर सुनेत्रा पवार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बारामती मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी माळवाडी (ता. बारामती) येथे भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली.

पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर दिला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.