श्री क्षेत्र गोदावरी धाम नदीवरील घाट बांधणे काम रेंगाळल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरुषोत्तम मासाच्या पार्श्वभूमीवर पवित्र स्नान करण्यासाठी सरला बेट येथे भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
तीन वर्षानंतर येणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच सुरू असल्याने व या महिन्यातील कमला एकादशी पर्वावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुवारी गोदावरी स्नान आणि समाधी दर्शनासाठी गर्दी झाली होती. मात्र, घाट बांधणे काम अपूर्ण असल्याने भाविकांचे गैरसोय झाल्याचे जाणवले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेटावर कमला एकादशीच्या पर्वावर भाविकांची गर्दी झाली होती. श्री क्षेत्र गोदाधाम सरला बेट या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांच्या समाधीस्थळी व महंत रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
गोदावरी स्नान करताना महिला भाविक ांची तारांबळ उडाली. घाट बांधकाम झाले नसल्याने उघड्यावर स्नान करण्याची महिलांवर आली. विशेषतः नाशिक येथे या वर्षी कुंभमेळा होत आहे. त्यामुळे परिसरातील भाविक कुंभमेळाच्या पर्वात सरला बेटावर स्नानासाठी येणार असल्याने सरकारच्या वतीने घाट बांधण्याचे काम मंजूर असून, ते लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी विश्वस्त मधुकर महाराज आणि सर्व भाविक, भक्तांमधून होत आहे.









